मराठी साहित्यात कुसुमाग्रज अजरामर – डॉ.महाजन

0

भुसावळ | प्रतिनिधी :  मराठी साहित्याला देशव्यापी ओळख मिळवून देण्यात वि.वि. शिरवाडकर उर्ङ्ग कुसुमाग्रज यांचा सिंहाचा वाटा आहे. वाचकांमध्ये अभिरूची निर्माण होण्यासाठी त्यांनी केेलेले प्रयत्न मराठीच्या विकासासाठी हातभार लावणारे होते. त्यामुळे मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे स्थान अजरामर राहिल, असे प्रतिपादन मराठी विभागाच्या प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांनी येथे केले.

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.व्ही. वायकोळे होत्या. प्रमुख वक्ते डॉ.आशालता महाजन यांनी कवि कुसूमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर माहिती देवून कुसूमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मानवतावादी लेखक असल्याचे सांगितले. तसेच मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असे सांगितले.

दिपप्रज्वलन, कवि कुसूमाग्रज यांचे प्रतिमा पुजन व त्यानंतर मराठी विभागप्रमुख डॉ.के.के.अहिरे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचे महत्व सांगुन मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात विद्यार्थ्यांना वाव असल्याचे सांगितले. डॉ.प्रकाश सपकाळे यांनी मराठी भाषेची उत्पत्ती सांगितली.

प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी धनश्री दिनेश जोशी हिने अण्णाभाऊ साठे लिखित माझी मैना गावावर राहिली ही लावणी सादर केली. तृतीयवर्ष  कला शाखेची विद्यार्थीनी बिलकिसजा पठाण हिने कुसुमाग्रजांची कविता पन्नाशीची उमर गाठली ही कविता सादर केली. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाने मराठी व्याकरणावर  ५० प्रश्‍नांची बहुपर्यायी स्पर्धा परिक्षा आयोजित केली.

त्यातील प्रथम रविना गजानन शिंदे, द्वितीय वैभव सुरेश सोनवणे व तृतीय ऐश्‍वर्या आनंद बहुरूपे यांना मराठी व्याकरणाची पुस्तके देवून गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.मिनाक्षी वायकोळे यांनी  कवी कुसूमाग्रजांच्या विपूल साहित्यातून मानवतेची पुजा बांधली असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन प्रा.समाधान पाटील यांनी तर आभार डॉ.जे.एङ्ग.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*