‘मराठी तारका’ पोहोचणार लेह आणि सियाचेनला!

0

महेश टिळेकर निर्मित व दिग्दर्शन असलेल्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.

आता येत्या २५ जून ते ५ जुलै या कालावधीत ‘मराठी तारका’चे प्रयोग लेह आणि सियाचेन येथे होणार आहेत.

या दोन्ही ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम तेथे केला जाणार आहे.

‘मराठी तारका’चा पहिला प्रयोग पुण्यात झाला होता. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तसेच लंडन, दुबई, अमेरिका येथेही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले आणि रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.

आशा भोसले, शरद पवार, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, पं. बिरजू महाराज, वहिदा रहेमान, हेलन आदी मान्यवरांनीही या कार्यक्रमाला आपली खास हजेरी लावली होती.

रेखा आणि माधुरी दीक्षित यांनी तर ‘मराठी तारका’च्या कार्यक्रमात आपले नृत्य सादरीकरणही केले होते.

LEAVE A REPLY

*