मराठीच्या पेपरलाही 19 जण जाळ्यात

0

नाशिक : नाशिक विभागात बारावी परीक्षेत मराठीच्या पेपरला 19 कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. सर्वात जास्त 8 कॉपीबहाद्दर नाशिक जिल्ह्यात सापडल्याची माहिती नाशिक परीक्षा मंडळ विभागाने दिली.

संपूर्ण राज्यासह नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. इंग्रजी, हिंदीनंतर गुरुवारी मराठीचा पेपर होता. यात नाशिक विभागातील 19 जणांवर कॉपी केसेसची कारवाई झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्यात एक तर त्र्यंबक येथील विद्यामंदिरात 8 जणांवर कॉपी केस करण्यात आली.

तर जळगाव जिल्ह्यात 6 कॉपी केसेस झाल्या. त्यात कानळदा येथे 3, जळगाव तालुक्यात 1 आणि एरंडोल येथे 2 जण जाळ्यात सापडले. याशिवाय धुळे जिल्ह्यातील खेड येथील 3 जणांवर कॉपी केस करण्यात आली. तर नंदुरबारमध्ये खांडबारा येथे एकावर कॉपी केस करण्यात आली, अशी माहिती विभागीय सचिव कार्यालयाकडून देण्यात आली.

यंदा सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परीक्षेच्या 200 मीटर परिसरात कोणलाही परवानगी देण्यात आलेली नसली तरी ग्रामीण भागात नागरिकांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून कॉपी पुरवण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळेच मराठीच्या पेपरला कॉपीबहाद्दरांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. पोलीस बंदोबस्त असला तरी ग्रामस्थ किंवा युवक त्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच कॉपी केसेस वाढत आहेत. नाशिक विभागातून 19 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*