ममता कुलकर्णी फरार घोषित

0
ठाणे येथील कोर्टाने अभिनेत्री ममता कुलकर्णीला 2000 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात फरार घोषित केले आहे.
ठाणे पोलिसांनी शुक्रवारी ममता कुलकर्णीच्या वर्सोवा यारी रोडवरील बंगल्यावर जाऊन कोर्टाची नोटीस चिकटवली.
नोटिसीनुसार, लवकरच अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिच्या पतीसह ठाणे कोर्टासमोर आत्मसमर्पण केले नाही तर तिची संपत्ती जप्त करण्यात येईल.
याआधी कोर्टाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
ममताला अनेक वेळा पोलिसांकडून नोटीसही पाठवण्यात आली, परंतु तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने ठाणे क्राइम ब्रँचने ती फरार असल्याची सूचना न्यायालयाला दिली होती.
याच सूचनेच्या आधारावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*