Video : मनमाडजवळ ट्रकने घेतला पेट ; वाहतूक खोळंबली

0

मनमाड (बब्बू शेख): मनमाडपासून जवळ मालेगांव रोडवर रात्री पेट्रोल घेऊन जाणारा टॅन्कर पलटी होऊन त्यातून इंधन गळती सुरु झाली होती.

त्यामुळे पुणे-इंदूर मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. टँकर हटविल्यानंतर वाहतूक सुरु होताच अवघ्या दोन तासानंतर याच मार्गावर माचीसचे बॉक्स (आगपेट्या) घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. त्यामुळे पुन्हा या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला.

टॅन्करच्या घटनेत ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले. तर ट्रकच्या घटनेत ड्रायव्हर आणि क्लिनर वाचले असले तरी ट्रक मात्र जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्या नंतर सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरु झाली.

LEAVE A REPLY

*