मनपा प्रभाग समिती सभापदीसाठी उद्या सभा

0

जळगाव |  प्रतिनिधी :  महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळ संपत असल्याने निवणुक प्रकीयेस सुरुवात करण्यात आली आहे. उद्या दि.३१ रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सभापदींसाठी सभा घेण्यात येणार आहे. चार समित्यांच्या सभापतीपदासाठी बुधवार मुदतीपर्यंत खाविआ, मनसे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी १२ अर्ज नेले आहेत. तर भाजपाकडून अर्ज नेण्यात आला नाही.

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडीसाठी उद्या दि.३१ रोजी सभा होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजेपासून चार प्रभाग समिती सभापती निवडीच्या चार स्वतंत्र सभा होणार आहेत. दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात या सभा होणार आहे.

दि. २७ मार्चपासून अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. दि.२९ रोजी अर्ज नेण्याचा शेवटचा दिवस होता. दि.३० रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत नगरसचिव यांच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. शुक्रवारी सभा झाल्यानतंर १५ मिनिटे माघारासाठी मुदत देण्यात येईल त्यांनतर निवडणुक होणार आहे.

सभापती निवडणुक बिनविरोध करण्याचा हालचाली

खान्देश विकास आघाडीने भाजपाला मागील निवडणुकींप्रमाणे सभापतीपदापासून दुर ठेवण्यासाठी रणनिती आखली जात आहे. खान्देश विकास आघाडी, राष्ट्रवादी व मनसेची युती असल्याने दोन सभापती खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी व मनसेला प्रत्येकी १ सभापती पद देण्यात येणार असून त्यानुसार ही निवडणुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

सध्याचे सभापती

प्रभाग समिती १ – दत्तू कोळी
प्रभाग समिती २ – इकबालोद्दीन पिरजादे
प्रभाग समिती ३ – हेमलता प्रमोद नाईक
प्रभाग समिती ४ – शोभा बारी

यांनी घेतले अर्ज

प्रभाग समिती सभापती निवडीचा अर्ज शेवटच्या वेळेपर्यंत नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी खान्देश विकास आघाडीसाठी ४ अर्ज, संतोष पाटील व पार्वताबाई भिल यांनी मनसेसाठी प्रत्येकी २ अर्ज, रविंद्र पाटील व गायत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रत्येकी २ अर्ज नेले आहेत. सभापतीपदाच्या ४ जागांसाठी यातिनही पक्षांच्या नगरसेवकांनी १२ अर्ज नेले आहेत. तर भाजपाकडून शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज नेण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

*