मनपा इमारत लोकार्पणासाठी खा.पवार उपस्थित राहणार!

0

धुळे । महापालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला दि. 2 सप्टेंबर रोजी खा. शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज माजी आ. राजवर्धन कदमबांडे व महापौरांनी इमारतीची पाहणी केली.

नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गेल्या महिन्यात खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही कारणामुळे पवार यांचा दौरा रद्द झाला होता. परंतु आता दि. 2 सप्टेंबर रोजी शरद पवार हे इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे.

आज नूतन इमारतीची पाहणी माजी आ. राजवर्धन कदमबांडे व महापौर कल्पना महाले यांनी केली. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत ओगले, किरण शिंदे, किरण पाटील, नगरसेवक कैलास चौधरी, कमलेश देवरे,

सुभाष जगताप आदी उपस्थित होते. 2 सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमात या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार असून यावेळी खा.पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

*