मनपाच्या पाणी वापराचे होणार ; ऑडिट पालकमंत्र्यांचे आदेश

0

नाशिक : महापालिका वापरत असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवला जाणार असून त्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यामुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध असले तरीही गरजेपुरतेच पाणी वापरता येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

नाशिक महापालिकेच्या पाणी वितरण प्रणालीत जवळपास 40 ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त गळती होत असल्याचे अनेकदा स्पष्टही झाले आहे. मनपाने ते नाकारले असले तरीही शहरातील लोकसंख्येला आवश्यक पाणी आणि प्रत्यक्षात उचलण्यात येणार्‍या पाण्याचा हिशोब लावल्यास गळतीचे प्रमाण लक्षात येते. पाणी गळती रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यासह पाण्याचा कमीत कमी अपव्यय कसा होईल. जास्तीत जास्त पाणी कसे वाचेल. अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांना पालकमंत्र्यांनी दिले. याकरिता आता महापालिकेत भाजपचीच सत्ता आल्याने त्या पार्श्वभूमीवर यंदा पालकमंत्र्यांनी थेट वॉटर ऑडिट करण्याचे स्पष्ट केले. तसे आदेशही महापौरांना दिले आहेत. त्यामुळे आता महापालिकेकडून वारेमाप पाणी उपशावर अंकुश येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा : पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शासनाने गेल्यावर्षी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी वितरणाचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आता मराठवाड्यासाठी नांदुरमध्यमेश्वर येथून पाईपलाईन टाकण्याचे संकेत पुन्हा एकदा पालकमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर निळवंडे आणि इतर ठिकाणीही त्याच पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*