Type to search

जळगाव

मनपाच्या घंटागाडीची खांबाला धडक

Share

जळगाव । मनपातर्फे शहरात घनकचरा उचलण्यात येत आहे. एकमुस्त मक्तेदारास घनकचरा उचलण्याचा ठेका दिलेला आहे. या मक्तेदारास मनपाने आपल्या घंटागाड्या कचरा उचलण्याकामी करारानुसार दिलेल्या आहेत. बुधवार सकाळी शहरातील घनकचरा गोळा करणार्‍या एका घंटागाडी चालकाने आकाशवाणी चौकात गणपती हॉस्पिटलच्या जवळपास एका खांब्यास ठोस मारली. यात घंटागाडीचा समोरचा भाग ठोकला गेल्याने याच भागाचे नुकसान अधिक झाले आहे.

घंटागाडीचालक आकाशवाणी चौकाकडून रस्त्याने जात असतांना त्यांच्या घंटागाडीचे टायर फुटल्याने घंटागाडी आयशर गाडीला ठोकली गेली त्यापाठोपाठ रस्त्याच्या कडेला असलेल्या खांब्याला ठोस मारली. यात घंटागाडी चालकास दुखापत झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दरम्यान घंटागाडी चालकास हॉस्पिटलमधील उपचारासाठी दाखल केले. वरिष्ठ अधिकारी याबाबत लक्ष देत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!