मध्य प्रदेश : ‘ब्लू व्हेल’ गेमच्या आहारी जाऊन विद्यार्थ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

0

मध्य प्रदेशातील इंदुर शहरात एका विद्यार्थ्याने ‘ब्लू व्हेल’ गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

‘ब्लू व्हेल’चा अंतिम म्हणजेच 40वा  टप्पा पार करण्यासाठी या विद्यार्थ्यानं शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शिक्षकानं या मुलाला पाहिलं व लगेचच त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. यामुळे त्या मुलाचा जीव वाचू शकला.

राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमेली देव शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या विद्यार्थी ‘ब्लू व्हेल चॅलेंज’मधील 50वा टप्पा पूर्ण करण्यासाठी  शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारत होता.

त्यानं उडी मारल्यास 2 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सतर्क शिक्षकाने या मुलाचा ‘ब्लू व्हेल गेम’मुळे बळी जाण्यापासून बचावले आहे.

LEAVE A REPLY

*