मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे अनिश्चित काळासाठी उपोषण

0

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे अनिश्चित काळासाठी उपोषण करणार आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता शिवराज सिंह चौहानांनी उपोषणाचा मार्ग स्वीकाराला आहे.

मध्य प्रदेशात सलग चौथ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक गाड्या जाळल्या, तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

 

LEAVE A REPLY

*