Type to search

maharashtra नंदुरबार

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मोबाईल वापरास बंदी

Share
नंदुरबार । नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 अंतर्गत 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी मतदान झालेले असून 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी व कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये यासाठी मतमोजणी केंद्राचे ठिकाणी मतमोजणी कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व प्रतिनिधी यांना मोबाईल व कुठलेही इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केलेली आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल वा इतर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर झाल्यास संबंधीताविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतमोजणी नुसार फेरीनिहाय निकाल घोषित करण्यासाठी मतमोजणी परिसराचे ठिकाणी लाऊडस्पीकरची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

यासाठी मतमोजणी केंद्राचे ठिकाणी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!