मतदार याद्या शुध्दिकरण मोहीम सुरू

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुध्दिकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान मतदार यादीतील मयत, स्थलांतरीत व दुबार व्यक्तींची नावे कमी करण्याची कार्यवाही जोरात सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) व ग्रामसेवक यांच्यामार्फत प्रत्येकी भागाची यादी तपासून मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांचे पंचनामे करण्यात येऊन सदर नावे यादीमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

 

अन्यथा बीएलओंवर कारवाई
याद्या शुध्दीकरण मोहिमेदरम्यान मतदार यादीतील मयत, स्थलांतरीत व दुबार व्यक्तींचे नावे कमी करण्याच्या कामात दिरंगाई करणार्‍या बीएलओंवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. यामध्ये बीएलओ म्हणून सर्वाधिक शिक्षक काम पाहत आहेत.

 

25 हजार नावे वगळली
नगर जिल्ह्यात एकूण 32 लाख 51 हजार मतदार नोंदणी आहे. त्यामध्ये मयतांची संख्या-10 हजार, स्थलांतरीत-8 हजार व दुबार मतदारांची संख्या 7 हजार इतकी आहे. सदर नावे कमी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. संबंधित नावे कमी झाल्यास 32 लाख 26 हजार मतदारांची नावे सुधारीत यादीमध्ये राहतील.

LEAVE A REPLY

*