मतदार यादीतील घोळप्रकरणी महापालिकाच जबाबदार ; आयोगाच्या बैठकित निवडणुक अधिकारयांची तक्रार

0

नाशिक : महापालिका निवडणुकीत अनेक मतदारांची नावे गहाळ झाली. मतदार याद्यांच्या या झालेल्या गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानापासून वंचीत राहीले. त्याची दखल तीव्र दखल घेत निवडणूक विभागाच्या वतीने नावे कशी गहाळ झाली, कुठल्या स्तरावर ती रद्द झाली, किंवा कोणी ती स्थलांतरीत केली. याबाबत मुख्य निवडणुक आयुक्त अश्विनकुमार यांच्याकडे झालेल्या बेैठकित चर्चा करण्यात आली. मात्र याबाबत प्रभाग रचना करतांना महापालिकेच्याच गोंधळामुळे हा घोळ झाल्याची तक्रार राज्यातील निवडणुक निर्णय अधिकारयांनी आयोगाकडे केली. त्यामुळे लवकरच मनपा आयुक्तांचीही बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या मुळ यादीचेच महापालिकेने प्रभाग निहाय आणि जिल्हा परिषदेने गट व गण निहाय विभागणी केली. पण मुळ यादीत नाव असतानाही अनेकांची नावेच डिलीट झाली. काहींचे प्रभाग आणि गट बदलले. इतरत्र नावे गेली. पत्ते बदलले. काहींची तर थेट मनपा हद्दीतून जिल्हा परिषद हद्दीत नावे समाविष्ठ झाले.असे नानाविध प्रकार घडले.

त्यामुळे मतदारांना मतदानच करता आले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याची दखल घेत राज्य निवडणुक आयुक्तांनी निवडणुक उपजिल्हाधिकारयांची बेैठक मुंबई येथे बोलावली होती. महापालिकेने विधानसभेची यादी जशीच्या तशी घेणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र यादी फोडतांना घोळ निर्माण झाला. तसेच काही महापालिकांनी संकेतस्थळावर यादी उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना ती काही महापालिकांनी उपलब्ध न करून दिल्याने राज्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अनेकांनी नावे शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यात नाव असूनही महापालिकेच्या यादीत नाव नसल्याने मतदारांचा गोंधळ निर्माण झाला. महापालिका यंत्रणास्तरावर मतदारांना माहीती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती अशा विविध प्रकारचे मुददे यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारयांनी मांडले. याबाबत आयोगाने गंभीरदखल घेतली असून महापालिका आयुक्तांनाही बैठकिसाठी बोलावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*