Type to search

धुळे

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात आठवडे बाजार बंद

Share

धुळे । विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून या दिवशी जिल्ह्यात भरणारे आठवडे बाजार अन्य सोयीच्या दिवशी भरविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबर 2019 रोजी धुळे जिल्ह्यात मतदान होईल. या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण, साक्री, शिरपूर व शिंदखेडा येथील तहसीलदारांनी या दिवशी भरणार्‍या आठवडे बाजारांची माहिती सादर केली आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी बाजार व जत्रा अधिनियमानुसार धाडरी, बोरकुंड, निमगूळ (ता. धुळे), निजामपूर- जैताणे, म्हसदी (प्र. नेर), वार्सा (ता. साक्री), शिरपूर शहर व तोंदे (ता. शिरपूर), शिंदखेडा (ता. शिंदखेडा) येथे सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरणारे आठवडे बाजार अन्य सोयीच्या दिवशी भरविण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!