Type to search

जळगाव

मतदानाची घटलेली टक्केवारी धोकादायक

Share

जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवार दि. 21 रोजी पार पडली. शहरात विविध भागात सकाळपासून दिसून आलेला मतदारांच्या निरुत्साहाचे रुपांतर टक्केवारीत घटण्यात झाल्याने शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त 39 टक्के मतदान झाले होते. टक्केवारीची आकडेवारी बघता, मतदानात जबरदस्त अशी घट झाली आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरात एकूण 64.95 टक्के इतके मतदान झाले होते.

2014 ची आकडेवारी बघता यंदा मतदानात तब्ब्ल 20 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते. मतदानाची घसरलेली टक्केवारी राजकारण्यांवरच्या रोषामुळे घटली की, वर्षानुवर्षे होत असलेल्या समस्यांच्या त्रासात कोणताही बदल झाला नाही म्हणून घटली. हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मतदानाची घसरलेली टक्केवारी कोणाला नुकसानदायक ठरणार हे 24 तारखेला स्पष्ट होणार असलेतरी घसरलेली टक्केवारी चिंताजनक असून राजकारण्यांना बोध घ्यायला लावणारी आहे. 2009 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरात फक्त 40 टक्के मतदान झाले होते. मात्र जवळपास सर्वच राजकीय पक्ष तसेच प्रशासनदेखील 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करुन घेण्यात अपयशीच ठरल्याचे हे द्योतक आहे. कोणतीही निवडणुक असो जळगावात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा बघावयास मिळतात. मात्र विधानसभेच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच ओस पडलेली मतदान केंद्रे बघावयास मिळाली. शहरातील पिंप्राळा, हुडको, हरिविठ्ठलनगर, समतानगर या परिसरात दुपारी 4 नंतर लागणार्‍या रांगाही यंदा बघावयास मिळाल्या नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!