मठगव्हाण येथील बालिकेवर बलात्कार करणार्‍या नराधमाला सक्तमजुरी

0

अमळनेर, |  प्रतिनिधी :   तालूक्यातील मठगव्हाण येथील अल्पवयीन १० वर्षाच्या बालीकेवर बलात्कार प्रकरणी आरोपी डेडक्या बारेला यांस आज जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सूनावली आहे.

सरकार पक्षातर्ङ्गे अँड शशीकांत पाटील यांनी काम पाहिले  पिडीत बालीकेचा लहान भाऊ बालसाक्षीदार राव्या बारेला तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ ताडे यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून न्या दिनेश कोठलीकर यांनी हा निकाल दिला

याबाबत घटनेची पार्श्वभूमी तालूक्यातील मठगव्हाण येथील एका १०वर्षिय अदिवासी पावरा समाजातील अल्पवयीन तरूणीवर गावातच राहाणार्‍या डेगर्‍या  पावरा या ४०  वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना दि. ३० जूलै २०१६ रोजी घडली होती .

सदर तरूणीला गावातील मराठी शाळेच्या पडक्या खोलीत दूसर्‍या एका लहान मूली बरोबर झोपली असतांना पहाटे ४ च्या सूमारास  तीला ऊचलून घेवून गेला व तिचेवर दोन वेळा बलात्कार केल्याची तक्रार  दि.५ ला तिच्या आजीने पोलीसात दिली

सदर पावरा कूटूंब मठगव्हाण गावापासून अर्धा कि. मी. अंतरावरील मराठी शाळेजवळील झोपडी वजा घरात गेल्या ७ ते८ वर्षापासून मोलमजूरी करून  रहात होते दि ३० ला तिचे आई वडील बाहेरगावी गेले होते बाजूच्या झोपडीतील एक लहान मूलीसह ती पिडीत मूलगी मराठी शाळेच्या पडक्या खोलीत  झोपली होती

या ठिकाणाहून त्या नराधमाने तिला ऊचलून नेवून अन्यात स्थळी शेतात कृरकृत्य केले ईकडे तिची आजी व  १२ वर्षाच्या भावाने शोध घेतला असता ती दूसरे दिवशी रूंधाटी शिवारात बेशूध्द अवस्थेत मिळून आली तिला अमळनेरच्या ग्रामिण रूग्णालयात आजी ने आणले तिला ५ टाके टाकून पारिचारीकेने पून्हा दोन दिवसाने टाके काढणेसाठी बोलावले होते

या प्रकाराची माहिती  गावातील कार्यकर्ते किरण पाटील यांना समजली तेव्हा तात्काळ संतप्त भावना व्यक्त करित आई वडीलांसमवेत पिडीत मूलीला घेवून पोलीसात तक्रार दिली होती .दरम्यान डेडर्‍या पावरा हा आरोपी घटनेनंतर गावातून गायब झाला होता तो वैजापूर गावाजवळील मध्यप्रदेश राज्यातील अदिवासी पाड्यातील गावातील रहिवाशी असून त्याला पोलीसांनी अटक केली होती

या घटनेची दावा जिल्हा न्यायालयात चालला त्यात आरोपीला बलात्कार प्रकरणात१०वर्ष व ईतर दोन कलमान्वेय प्रत्येकी ७ वर्षाची व भाजवी कलम ५०६प्रमाणे २वर्षाची शिक्षा सूनावली तसेच त्या पिडीत मूलीला नुकसान भरपाई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून ठरवून आरोपीने देण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

आग लावणार्‍यास सक्तमजुरी

दारू साठी आरोग्यसेविकेने  पैसे न दिल्याचा राग येऊन तिच्या शासकीय घराला आग लावून पसार झालेल्या विरोधात पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्याचा निकाल येथील जिल्हा स्तर न्यायालयाने दिला आहे.

कामरूलजी बारेला (रा. कर्जाने, ता. चोपडा ह.मु मांडळ) याने दि १९ रोजी सकाळी १० वाजेला घटनेतील ङ्गिर्यादी कमल संभू बाविस्कर(आरोग्य सेविका मांडळ) हिच्याकडे दारू पिण्याकरिता १० हजार रुपयाची मागणी करत नोकरीचा राजीनामा देऊन माझ्यासोबत कर्जाने येथे रहावयास चल असे म्हणत होता. त्यास आरोग्यसेविकेने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केले. या सर्व घटनेला घाबरून ङ्गिर्यादीने साक्षीदार असलेल्या रंजनाबाई सैंदाणे याच्या कडे पळ काढला.

याचा राग येऊन आरोपीने शासकीय निवासस्थाने आग लावून पेटवून दिले. यात शासकीय कागदपत्र व ङ्गिर्यादीचे असलेले संसारपयोगी वस्तू जळाल्या हे सर्व करून आरोपी तेथून पसार झाला. या सर्व घटनेत शासनाचे जवळपास १ लाखाचे नुकसान झाल्यामुळे दि १९ तारखेला मारवड पोलिसात ङ्गिर्यादी यांनी कलम ४३६,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पो हे को रोहिदास जाधव याच्या कडे दिला होता.

या सर्व खटल्यात सरकार पक्षातर्ङ्गे ५ साक्षीदार तपासण्यात आले होते. यात रंजनाबाई सैंदाणे व ग्रामीण  रुग्णालय मांडळ चे डॉ घनश्याम पाटील यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. त्यावरून आरोपीस  दोषी ठरवत कलम ४३६ प्रमाणे ५ वर्षाची शिक्षा व १ हजार रु दंड,दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा अति जिल्हा न्यायधीश दिनेश कोठलीकर यांनी आज सुनावली.

सरकार पक्षातर्ङ्गे ऍड किशोर बागुल (मंगरूळकर)यांनी काम बघितले. यातील आरोपी हा अपराध घडल्या पासूनच जिल्हा कारागृहात आहे.

LEAVE A REPLY

*