मंत्री बेग यांच्याविरोधात आज बेळगावात मराठीजनांचा मोर्चा

0

कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्याविरोधात आज बेळगावात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 24 ते 27 मेपर्यंत ही प्रवेशबंदी लागू राहणार आहे.

लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिली होती.

आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द करणार, असा नवीन कायदा कर्नाटक सरकार अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही रोशन बेग यांनी स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

*