मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारण्याची तरुणाची धमकी

0

शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला. सातव्या मजल्यावर खिडकी बाहेरील सज्जावर तो उभा राहिला.

मला कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा इथून उडी मारेन, अशी धमकी त्या तरुणाने दिली.

तरुणाच्या या इशारानंतर सुरक्षा यंत्रणाही कामाला लागल्या. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून पोलीसही त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मंत्रालयाजवळ बघ्यांची गर्दीही वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे हेदेखील सातव्या मजल्यावर पोहोचल्याचे समजते.

दरम्यान, हा तरुण सातव्या मजल्यावर सज्जापर्यंत कसा पोहोचला, असा प्रश्नही निर्माण झाला.

LEAVE A REPLY

*