Type to search

धुळे राजकीय

मंजूळा गावीत यांच्या प्रचार फेर्‍यांना प्रतिसाद

Share

पिंपळनेर । पिंपळनेरसह साक्री तालुक्यातून सौ.मंजुळा गावित यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून साक्री नगर पंचायती, साक्री तालुका शेतकरी संघटना व मुस्लीम समाजाने पाठिंबा व्यक्त केला आहे. तर तालुक्यात खा.हिना गावीतांनी विरोधात काम करणार्‍यांना भाजपात घेतल्याने अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्ते दुखावल्याने मंजुळा गावितांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत.

मंजूळा गावीत म्हणाल्या की, गेल्या 20-25 वषार्ंपासून साक्री, पिंपळनेर व पश्चिम पट्यात निष्ठेने भाजपाचे काम केले. तर मागील पंचवार्षिकमध्ये माझ्या विरोधात काम करणार्‍या मोहन सूर्यवंशी यांना तिकीट देऊन माझ्यावर अन्याय केला आहे. खा.हिना गावीत यांच्या विरोधात काम करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यासकट त्यांचा कार्यकर्त्यांना भाजपात पक्ष प्रवेश देवूनभाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तालुक्यात एक प्रकारे खच्चीकरण होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!