मंगळग्रह मंदिर परिसर विकासासाठी ४८ लाखांचा निधी-आ.शिरीष चौधरी

0

अमळनेर |  प्रतिनिधी : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा विस्तार झपाट्याने वाढून भक्तगणांच्या सहकार्याने अनेक सोई,सुविधा व विकासकामे मार्गी लागली असतांना मंदिराचे वाढते महत्व लक्षात घेवून शासनानेही मदतीचा हात पुढे केला आहे.

या माध्यमातून महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात मंदीर परिसरात विकास कामे करण्यासाठी ४८ लाख निधी मंजुर करून जिल्हाधिकार्‍यांकडे वितरीत करण्यात आला असल्याची माहिती आ.शिरीष चौधरी यांनी दिली आहे.

या मंदिरामुळे अमळनेरचे महत्व वाढण्यासोबतच शहराची आर्थिक सुबत्ताही वाढत असून पर्यटन म्हणून या स्थळाचा विकास झाल्यास अमळनेरची तुलना मोठ्या तिर्थक्षेत्रांची होवू शकणार आहे.यामुळे श्री चौधरींनी मंदिर विश्‍वस्तांशी चर्चा करून सुमारे ५ कोटींचा प्रस्ताव शासनाच्या पर्यटन सांस्कृतीक कार्य विभागाकडे सादर केला होता.

मंगळग्रह देव मंदिर परिसरात विकासकामे व स्त्री-पुरूषांसाठी शौचालय बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देवून ५ कोटी पैकी ४८ लाख रूपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

दरम्यान मंजुर तरतुदीतुन हा खर्च मार्च-२०१७ पर्यंत करावयाचा असून कामे तात्काळ करावयाचे आदेश असल्याने लवकरच विकास कामांना सुरूवात होणार आहे.

भाविक भक्तांसोबतच शासनानेही आता मदतीचा हात पुढे केल्याने मंदिर विश्‍वस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठे तिर्थ व पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.आ.शिरीष चौधरी व डॉ.रविंद्र चौधरी यांच्या अथक प्रयत्नांनी हा निधी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*