मँचेस्टर हल्ल्याचा ब्रिटनकडून बदला!

0

मँचेस्टरमधील अरियाना ग्रँडेच्या कॉन्सर्टदरम्यान घातपाती हल्ल्याचा बदला म्हणून ब्रिटिश सरकारने आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक सुरु केली आहे.

ब्रिटिश हवाई दलाच्या विमानांनी आयसिसच्या तळांवर हल्ला चढवला आहे.

‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश लिहिलेले बॉम्ब ब्रिटिश सरकारच्या रॉयल एअर फोर्सकडून टाकण्यात आयसिसवर टाकण्यात आले आहेत.

ब्रिटिश हवाई दलाकडून आयसिसच्या तळांवर टाकण्यात येणाऱ्या बॉम्बचे फोटो जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

ब्रिटिश हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र खरे असल्याचे म्हटले आहे.

मागील आठवड्यात करण्यात आलेल्या या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ११९ लोक जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

*