भोकरच्या तरुणाचा मृतदेह बेलवंडी तलावात

0

वडिलांना अंत्यसंस्काराला थांबता आले नाही; तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

 

माळवाडगाव, भोकर (वार्ताहर)- पुणे जिल्ह्यातील (पुणे) घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात इंजिनिअरिंग विभागात नोकरीस असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव शिवेलगत भोकर शिवारातील तरुणास काही लोकांनी चार चाकी गाडीमध्ये उचलून नेवून गायब केले. त्यानंतर तिसर्‍या दिवशी बेलवंडी-विसापूर तलावात त्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्याला ठार मारुन त्याचा मृतदेह या तलावात फेकून देण्यात आला असावा असा सशय व्यक्त करण्यात आला असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. याबाबत आज किंवा उद्या फिर्याद दाखल करण्यात येणार असून त्यापकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. सुरेशचा मृत्यू संशयास्पद झाल्याने सासरकडील लोक येताच या परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. या तणावपूर्ण वातावरणात सुरेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव शिवेलगत भोकर शिवारातील येथील सुरेश बाबुराव मुठे (वय-41) या तरूणास घरातून मोबाईलवर बोलावून घेत चार चाकी गाडीमध्ये उचलून घेवून जावून मारहाण करत खुन करण्यात आला. तिसर्‍या दिवशी बेलवंडी-विसापूर तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने घोडगाव गंगा कारखान कॉलनी व मुठेवाडगाव येथे खळबळ उडाली आहे.

 
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव शिवेलगत भोकर शिवारातील तरूण सुरेश बाबुराव मुठे हे गेली 17 वर्षापासून शिरूर येथील घोडगाव गंगा साखर कारखान्यात हाय पावर वेल्डर म्हणून नोकरीस होते. सोमवार दि. 15 मे 2017 रोजी सायंकाळी घरी आल्यावर पत्नीने त्यांना चहासाठी आवाज दिला असताना त्यांना एक मोबाईल आला. त्यावर तातडीने त्यांनी मोटारसायकल सुरू केली व निघून गेले. रात्री 8 वाजेच्या सुमारास मी केडगाव चौफुला येथे आहे, जेवणासाठी घरी येतो असे सांगितले. रात्रभर वाट पाहुनही ते घरी परतले नाही.

 

दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता कारखाना फाट्यावर सुरेशची मोटारसायकल बेवारस उभी असल्याची खबर कॉलनीत आली. त्याची पत्नी व नातेवाईक तातडीने मोटारसायकलजवळ गेले. मोटारसायकलशिवाय त्या ठिकाणी अन्य काहीही दिसून आले नाही. त्या परिसरातही सुरेश मुठेचा शोध घेतला असता तो त्या ठिकाणीही मिळून आला नाही. त्यानंतर अखेर शिरूर पोलीस ठाण्यात सुरेश बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिसर्‍या दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी-विसापूर तलावात एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर मारहाणीच्या खुना होत्या. त्याच्या खिशात ओळखपत्रासह पत्नी, मुलांचे व नातेवाईकांचे मोबाईल नंबर मिळाल्याने बेलवंडी पोलिसांनी तातडीने या मोबाईल नंबरशी संपर्क केला. त्यानुसार त्या ठिकाणी त्याचे नातेवाईक आले व त्यांनी सुरेशला ओळखले.

 
पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला नंतर त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर तरूणाचा मोबाईल जप्त केलेला असल्याचे त्याच्या कॉल्स डिटेल्स वरून आरोपीपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे.
याबाबत बेलवंडी पोलीस तपास करत असून तपासाची चके वेगाने फिरविली आहेत. मिसिंग म्हणून शिरुर पोलीस स्टेशनला तकार दाखल करण्यात आली होती त्यामुळे या पकरणाचा तपास कोणत्या पोलीस ठाण्याचे पोलीस करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

वडिलांना अंत्यसंस्काराला थांबता आले नाही
सुरेश मुठे यांची सासुरवाडी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील आहे. अत्यंसंस्काराच्यावेळी रात्री सुरेशच्या सासुरवाडीच्या लोकांनी सुरेशचा भाऊ गणेश व वडील बाबुराव यांना धक्काबुक्की करुन तेथून बाहेर काढल त्यामुळे सुरेशच्या अंत्यविधीस त्याच्या वडिलांना थांबता आले नाही. यावेळ सुरेशचे सासरवाडीचे लोक व मुठे परिवाराचे लोक आल्यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुठे कंपनीही जसास तसे उत्तर देण्यास सज्ज झाल्यानंतर काहीननी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वातावरण काहीसे शांत झाले.

LEAVE A REPLY

*