भूषण लोंढेची कारागृह कर्मचाऱ्यास मारहाण

0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिपाई प्रविण वाघमारे यांना कैद्यांकडून मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती.

कारागृहातील बराकीमध्ये जाण्यास सांगितले याचा राग मनात धरून पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे आणि साथीदारांनी पोलीस शिपायास नाशिकरोड कारागृहातच मारहाण केली.

याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा नाशिकरोड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

सातपूर दुहेरी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित भूषण लोंढे नशिकरोड कारागृहात आहे. कारागृहातील बराकीत जाण्यास सांगितले. म्हणून शिपायाचा राग मनात धरून भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस शिपाई प्रवीण वाघमारे यांस मारहाण केली होती.

LEAVE A REPLY

*