भुसावळ पं.स.सभापतीपदी सुनील महाजन : उपसभापतीपदी सौ.मनीषा पाटील

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  पंचाय समिती सभापतीपदी सुनील महाजन तर उपसभापती पदी मनीषा पाटील यांची सभागृहात हात उंचावून झालेल्या निवडणूकीत निवड झाली.

त्यांना प्रत्येकी ४-४ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशा निसाळकर तर उपसभापती पदासाठी विजय सुरवाडे यांनी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते त्यांना प्रत्येकी दोन-दोन मते मिळाली.निवड घोषित होताच कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. दरम्यान सभापती कक्षातील माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्या नावाची पाटी कार्यकर्त्यांनी उपटून तोडण्यात आली.

पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पाडली. सकाळी ११ वाजता भाजपातर्फे सभापती पदासाठी सुनील महाजन,उपसभापती पदासाठी मनीषा पाटील यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सभापती पदासाठी आशा संतोष निसाळकर यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे विजय सुरवाडे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली यावेळी मंंचावर गट विकास अधिकारी सुभाष मावळे, श्री शिरसाठ होते. सुरुवातीलला दाखल चारही नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. छाननीत चारही अर्ज वैध ठरले. नामनिर्देशन पत्र दाखल करणार्‍या उमेदवारांमधून माघारी न झाल्याने हात उंचावून मतदान करण्यात आले.

यात सभापती पदासाठी आशा संतोष निसाळकर यांना स्वत: चे एक व शिवसेनेचे विजय सुरवाडे यांचे एक अशी दोन मते मिळाली तर सुनील श्रीधर महाजन यांना स्वत: सह मनीषा भालचंद्र पाटील, वंदना उन्हाळे, प्रती पाटील यांनी मतदान केले.  उपसभापती पदासाठी भाजपातर्फे मनीषा भालचंद्र पाटील यांना स्वत: सह सुनील महाजन, वंदना उन्हाळे, प्रती पाटील यांनी मतदान केले.

तर शिवसेनेच्या विजय सुरवाडे यांना स्वत: सह आशा निसाळकर यांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रियेनंतर विजयी उमेदवारांची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी घोषणा केल्यानंतर सभागृहाबाहेर पदधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर नवनिर्वाचित पंस सदस्य विजय सुरवाडे यांनी, पं.स.सदस्या प्रीती पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आपल्या खडका सरपंच पदाचा राजीनामा न दिल्याने व त्या आज दि. १४ मार्च रोजीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत असल्याने त्यांची शहानिशा करुवी तसे असल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत सभागी करुन घेऊ नये याबाबत  निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती.

त्यांनी या प्रकरणाची पं.स. सदस्या  प्रीती पाटील यांच्याकडे विचारणा केली असता. आपण आपल्या सरपंच व ग्रा.पं. सदस्य पदाचा राजिनामा पूर्वीच सभापती यांच्याकडे दिल्याचे सांगितले. याला गट विकास अधिकारी सुभाष मावळे यांंनी समर्थन केली. याबाबत पंचायत समितीच्या प्रोसिडींग बुकात नोंद घेण्याच्या सुचना निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. चिंचकर यांनी दिल्या.

सभापतींचे नामफलक तोडले

मतदान प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सदस्य सभापती दालनात  कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह दाखल झाले. यावेळी सभागृहात  मावळते सभापती राजेंद्र चौधरी यांच्या नावाची लावलेली पाटी काही कार्यकर्त्यांनी तोडून फेकली.

सावकारे गटाचा सभापती

पं.स. सभापती पदासाठी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे गटाचे मावळते उपसभापती मुरलीधर(गोलू) पाटील यांच्या पत्नी प्रीती पाटील इच्छुक होत्या मात्र सावकारे गाटाचे सुनील पाटील यांनी सभापती पदी निवड करण्यात आल्याची चर्चा पंचायत समिती परिसरात सुरु होती

निवड प्रक्रियेदरम्यान परिसरात आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा़.डॉ. सुनील नेवे यांच्या सह  किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, माजी जि.प.सदस्य समाधान पवार, नगरसेवक पिंटू ठाकूर, सामाजिक कर्याकर्ते  प्रमोद सावकारे, नारायण कोळी, उल्हास बोरोले, बंटी सोनवणे, ज्ञानदेव झोपे, प्रमोद वारके, किरण चोपडे, मनोज कोल्हे, दिनेश नेमाडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, चुडामण भोळे, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी आदींची उपस्थिती होती़

LEAVE A REPLY

*