Type to search

धुळे

भिंतींना चढतोय साज, स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत धुळे महापालिकेचा अभिनव उपक्रम

Share

धुळे । स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत धुळे महानगरपालिकेमार्फत स्वच्छता व प्लास्टिक बंदी या जनजागृती व प्रबोधनासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून धुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या कुम्पण भिंती रंगवुन व सजवून त्यावर प्लास्टिक बंदी व स्वच्छतेचे संदेश देण्याचा अभिनव उपक्रम धुळे महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

प्लास्टिक बंदीसाठी धुळे महापालिकेने यावेळी प्रभावीपणे मोहीम राबवली होती. आज त्याचा दृश्य परिणाम प्रामुख्याने दिसून येत आहे. सदर प्लस्टिक बंदी अधिक प्रभावीपणे व्हावी व नागरिक व सर्वसामान्यांमध्ये जनजागृती प्रबोधन व्हावे यासाठी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील असलेल्या शासकीय व महाविद्यालयाच्या आवारातील कुंपण भिंती रंगवण्याचे काम सुरू झालेले आहे. यात प्रामुख्याने बाफना शाळा, कमलाबाई हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, जुनी महापालिकेच्या मागे, आंबेडकर लॉ कॉलेज, जयहिंद जलतरण तलाव जवळ, सिध्देश्वर गणपती मंदिर, अंधशाळे जवळ, तालुका पोलिस स्टेशन, बाराफत्तर चौक, टेक्निकल हायस्कूल, संभाजी गार्डन, नकाणे रोड, 28 नं शाळा, बस स्टँड याठिकाणी प्लस्टिक बंदीचे संदेश रंगवण्यात आलेले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यातही वाढ होत आहे.

या रंगवलेल्या भिंती नागरिक व प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलाचा विषय ठरत असून या आकर्षक भिंती आज सेल्फी पॉईन्टंस् ठरलेले आहेत. अनेक विद्यार्थी व नागरिक घोळक्या- घोळक्याने या संदेशाचे वाचन करतांना दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या माध्यमातुन घर स्तरावर कचर्‍याचे वर्गीकरण करुन ओला व सुका कचरा देण्यासाठी आम्ही तयार आहोत त्याच बरोबर प्लस्टिक न वापराबाबत तसेच स्वच्छतेबाबत असलेले हे भित्ती संदेश धुळे शहरात नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी अत्यंत परिणामकारक ठरत आहेत. स्वच्छता व प्लस्टीक बंदी ही सर्वसामान्य नागरिकांची चळवळ व्हावी यासाठी महापालिकेमार्फत सुरू असलेले हे जनजागृती व व प्रबोधनाचे कामाबाबत शासनाकडूनही विशेष दखल घेण्यात आलेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!