भिंगार छावणी मंडळाची भरती प्रक्रिया रद्द

0

छावणी मंडळाच्या दिल्ली येथील वरिष्ठांचे
आ देश : 24 जागांसाठी होणार नव्याने भरती

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी मंडळाची 3 महिन्यांपूर्वी राबवलेली नोकरभरती प्रक्रिया छावणी मंडळाच्या दिल्ली येथील वरिष्ठांकडून रद्द ठरवण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शक सुचनांनूसार पुन्हा नव्याने नोकरभरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती भिंगार छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लाटे यांनी दिली.
भिंगार छावणी मंडळाने 3 महिन्यांपूर्वी विविध संवर्गातील 24 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. यात लिपीक, शिपाई, गवंडी, प्लंबर, वाहन चालक, सफाई कामागर या संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश होता. या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागवल्यानंतर भरतीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानूसार उमेदवारांना कॉल लेटर पाठवून त्याची लेखी, तोंडी आणि शारिरि चाचणी घेतल्यानंतर काही उमेदवारांना नियुक्तीचे पत्र छावणी मंडळाकडून देण्यात आले होते.
ही प्रक्रिया जानेवारी महिन्यांत पारपडली होती. दरम्यान आपली भरतीत निवड होईल, अशी खात्री उमदेवारांनी भरती झालेल्या उमदेवारांची यादी पाहिल्यानंतर भरती गोंधळ झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या भरतीत लाखोंचे अर्थ पूर्ण व्यवहार झाल्याची तक्रार खा. दिलीप गांधी यांच्याकडे करण्यात आली. त्यानूसार खा. गांधी या समक्ष आणि पत्र पाठवून भरतीसंदर्भात छावणी मंडळाकडे विचारणा केली होती.
अखेर खा. गांधी यांनी दिल्लीला छावणी मंडळाच्या कार्यालयात लेखी तक्रार अर्ज केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी भिंगार छावणी मंडळाला दिल्लीहून छावणी मंडळाचे प्रंबध संचालक यांनी पत्र पाठवून खा. दिलीप गांधी यांच्या तक्रारीचा संदर्भ देऊन केलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले.
तसेच नव्याने मार्गदर्शक सुचनाच्या आधारे पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात आदेश दिले आहेत. यानूसार नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाटे यांनी सार्वमतशी बोलतांना सांगितले.

 

या भरती प्रक्रियेत पैसे देवून नियुक्तीचे आदेश न मिळालेल्या नेवासा तालुक्यातील एका उमेदवारांने तीन दिवसांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात खासगी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत छावणी मंडळातील तीन अधिकार्‍यांवर नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली असल्याचे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*