भिंगारमध्ये मुकबधीर मुलीवर अत्याचार

0

गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगारमधील वडारवाडी येथे राहणार्‍या एका मुकबधीर मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पिडीत मुलगी चार महिन्याची गरोदर असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडारवाडी येथे एक गरिब कुटुंब राहते. पिडीत मुलीचे पोट दुखत असल्यामुळे तिच्या पालकांनी शुक्रवारी (दि. 9) तिला रुग्णालयात दाखल केले.

तपासणीनंतर ती गरोदर असल्याचे तिच्या आई वडीलांना सांगण्यात आले. आई-वडील कामाला गेल्यानंतर पिडीत मुकबधीर मुलगी घरी एकटीच असत.

अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यात सांगितल्यानंतर भिंगार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पिडीत मुलीच्या पालकांचे जबाब घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*