भिंगारमध्ये तरुणीच्या घरावर सशस्त्र हल्ला

0

तरुणीशी गैरवर्तन : सहाजणांवर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीशी सहा जणांनी गैरवर्तन करून तिच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. पिडीत मुलीस मारहाण करुन तिचे पालाचे घर आरोपींनी पाडून टाकले. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भिगार येथील मारुती मंदीराच्या जवळ ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद अजहर मिर्झा, मुस्तक फिरोज पठाण, महेबुब अहमद शेख, जायदा फिरोज पठाण, शबु अहमद मिर्झा, शबनम फिरोज पठाण (रा. भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी एक तरुणी पाणी भरण्यासाठी नळावर गेली होती. त्यावेळी आरोपी अहमद मिर्झा तेथे गेले व पिडीत तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागितला. त्यावर पिडीत तरुणीने नकार दिला असता आरोपीने तिच्यासोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिला शिवीगाळ, दमदाटी व धकमी देत त्याने मारहाण केली. अन्य आरोपींनी पिडीत मुलीस पैशाचे अमिष दाखवून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलगी घरी गेली असता आरोपींनी रागाच्या भरात तिला बॅटने मारहाण केली. तसेच पिडीत मुलीच्या घरावर हल्ला करीत तिचे पालाचे घर पाडून टाकले. हा प्रकार पेलिसांना सांगितला असता त्यांनी पिडीत मुलीची फिर्याद घेतली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. कवडे हे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*