भाववाढीची फोडणी

0

टोमॅटो 40 रु. किलो, कोथिंबिरची जुडी 25 रुपयांना

अर्जुन राजापुरे @ अहमदनगर 

उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने सध्या भाजी बाजारही कडाडला आहे. टोमॅटो 40 रुपयाने तर कोथिंबिरीची जुडी 25 रुपयांनी विकत घ्यावी लागते. परिणामी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे बजेड बिघडले आहे.
नगर शहरात सर्जेपुरा, नेहरू मार्केट, गाडगीळ पटागंण, दिल्ली गेट पटागंण, माळीवाडा, केडगांव, नागापूर, यशोदा नगर, भिस्तबाग, आदी सह शहरातील विविध ठिकाणी अनेक तालुक्यात ील भाजी विक्रते तसेच अनेक व्यापारी हे भाजी विक्रीसाठी येत असतात. तसेच या सर्व ठिकाणी दररोज मोठा भाजी बाजरात भरते. मार्केट मध्ये सर्व शेत मालाची कमी आवक होत असल्याने
विविध भाज्याचे दर हे वाढले आहे.
नगरच्या ठोक भाजी बाजरामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मागील काही महिन्यामध्ये भाज्याची चांगली आवक होत होती. मात्र सध्या उन्हाचा पारा चांगला वाढला असल्याने अनेक तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई दिसून येत आहे. त्यांचा परिणाम प्रामुख्याने शेतमालावर झाल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे शहरात येणारे भाजी पाल्यामध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील विविध मार्केट मध्ये अनेक भाज्यांचे दर हे मागील काही महिन्यामध्ये सामान्य नागरिकांच्या अवाक्या मध्ये होते. मे च्या दुसर्‍या आठवड्यामध्ये विविध भाज्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तसेच पालेभाज्या मध्ये 10 ते 15 रूपयांची वाढ झाल्याने अनेक कुटूंबाचे आर्थिक गाणित कोसळले आहे.

भाज्यांचे दर वाढल्याने सर्व सामन्या कुटूंबाचे घर खर्चाचे नियोजन कोसळले आहे. जेथे आम्ही 1 किलो भाजी घेत होतो. त्या ठिकाणी आता अर्धा किलो भाजी विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे सध्याच्याय परिस्थिती मध्ये आम्ही कसे बसे भाज्यांचे दर वाढल्याने सर्व सामन्या कुटूंबाचे घर खर्चाचे नियोजन कोसळले आहे. जेथे आम्ही 1 किलो भाजी घेत होतो. त्या ठिकाणी आता अर्धा किलो भाजी विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे सध्याच्याय परिस्थिती मध्ये आम्ही कसे बसे घर चालवता आहोत.
– अकिंता तांबे , गृहिणी

 

LEAVE A REPLY

*