भारनियमनाची घटिका

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील वीज तयार करणारे विविध वीजनिर्मिती केंद्र बंद पडत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला लागणारी 350 मेगावॅट ची गरज भासत मात्र सध्या 250 मेगावॅ विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर शहरात मागील पाच ते सहा दिवसापासून अनिश्‍चित काळ भारनियमन केले जात आहे. विजेची तूट भरून निघत नसल्याने भारनियमाच्या वेळापत्रका नुसार शहरात भारनियमन केले जात आहे. नियमित वीजबिल भरणारे व विजेची तूट न होणारे भाग अ,ब,क,ड गटांत येतात. त्या अ गटांत शंभर टक्के थकबाकी नसल्याने नगरशहरातील या गटात एकाही भागाचा समावेश होत नाही. जास्तीत जास्त वीजचोरी व थकबाकी जी गटात मोडते. त्यामुळे येत्या काळात शहरातील नागरिकांना भारनियमानाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

गटनिहाय परिसर –
गट अ – एकही नाही.
गट ब – मल्हार चौक, स्टेशन रोड, गुलमोहर रोड,
गट क – मार्केट यार्ड, सिध्दिविनायक मंदिर,
गट ड – झेंडी गेट, गंजबाजार, माळीवाड, सारसनगर, वसंत टेकडी,ङ्गकीरवाडा, शिवाजीनगर, बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, जिल्हा रूग्णालय परिसर.
गट ई – केडगांव, भिंगार, बुर्हाणनगर, केडगांव देवी रोड, भूषण नगर, लाल टाकी, तेलीखुंट, बोल्हेगांव,
गट ङ्ग – दरेवाडी,
गट जी 1 – एकही नाही.
गट जी 2 – अरणगांव रोड, नवनागापूर
गट जी 3 – मुकुंदनगर

गट सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार मंगळवार, गुरुवार, शनिवार
गट अ स. 7.30 ते 9 व दु.2.30 ते 4.15 स.9 ते 10.45 व दु.4.15 ते 5.15
गट ब स. 7.30 ते 9.30 व दु.2 ते 4 स.9.30 ते 11.30 व सायं. 4 ते 6
गट क स.6 ते 8.30 व दु.1.45 ते 4 स.8.30 ते 10.45 व सायं. 4 ते 6
गट ड स.6 ते 8.45 व दु. 12.30 ते 3.15 स.8.45 ते 11.30 व दु. 3.45 ते सायं. 6.30
गट ई स. 6 ते 9 दु. व 12.15 ते 3.30 स. 9 ते 12.15 व दु.3.30 ते सायं. 6.30
गट ङ्ग स. 6 ते 9.30 व स. 11.30 ते दु.3 स. 9.30 ते दु.1 व दु.3 ते सायं. 6.30

गट जी 1 स.6 ते 10.10 व दु.2.45 ते सायं 6.30
गट जी 2 स. 6 ते 10.30 व दु.2 ते सायं. 6.30
गट जी 3 स.6 ते 10.30 व दु.2 ते सायं.6.30

LEAVE A REPLY

*