भारत मालिका विजयासाठी सज्ज

0
हॅमिल्टन । या मोसमात बर्‍याच गोष्टी भारतीय संघासाठी प्रथमच ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. भारताच्या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली असून रविवारी होणार्‍या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघ मालिका विजयाच्या निर्धारानेच मैदानात झुंजणार आहेत.

गत तीन महिन्यांच्या दौर्‍यात भारतीय संघाने संस्मरणीय यश संपादन केले आहे. ऑस्ट्रेलियात 70 वर्षांत प्रथमच कसोटी मालिका विजय, वन-डे मालिकेत सरशी, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये दहा वर्षांनंतर वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे. आता भारताला न्यूझीलंडमध्ये पहिला टी-20 मालिका विजय नोंदविण्याची नामी संधी आहे. विदेशातील आव्हानात्मक परिस्थितीत आणखी एक मालिका जिंकण्यापेक्षा मोठी प्रेरणादायी गोष्ट असू शकत नाही. भारतीय संघाने शुक्रवारी मिळवलेला विजय हा न्यूझीलंडविरुद्धचा त्यांच्याच घरच्या मैदानावरील 10 वर्षांतील पहिलाच टी-20 विजय ठरला.

भारताने पहिल्या दोन सामन्यांत तोच अकरा खेळाडूंचा संघ खेळविला, परंतु जर संघव्यवस्थापनाने तिसर्‍या सामन्यासाठी संघात काही परिवर्तन करण्याच्या विचार केला, तर फिरकीपटू यजुवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अष्टपैलू विजय शंकरच्या जागी केदार जाधव अंतिम अकरामध्ये स्थान पटकावू शकतो. कृणाल पांड्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्यामुळे त्याचे स्थान पक्के आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार व खलील अहमद हेच कायम राहतील.

तिकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने आपल्या क्षमतेनुसार मर्यादित षटकांच्या मालिकेत सामना केला. गत तीन आठवड्यात ज्येष्ठ फलंदाज रॉस टेलरसुद्धा कधी थंड, तर कधी गरम राहिला. गोलंदाजांमध्ये टीम साऊदीने पहिल्या सामन्यात प्रभावी प्रदर्शन केले व दुसर्‍या सामन्यात स्कॉट कुगेलजनसोबत संमिश्र यश मिळविले.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रिंसग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या व मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ
केन विल्यम्सन, डग बेसवेल, कोलीन डी गॅण्डहोम, लॉकी फर्ग्युसन, स्कॉट कुगेलजन, कोलीन मुनरो, डॅरील मिशेल, मिशेल सॅण्टनर, टीम सेफर्ट, ईश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, जेम्स निशाम.

LEAVE A REPLY

*