Type to search

क्रीडा

भारत-पाक पुन्हा लढत

Share

मुंबई । या विश्वचषक स्पर्धेत लागलेल्या काही अनपेक्षित निकालामुळे सेमी फायनलची रंगत आणखी रोमांचक झाली आहे. आतापर्यंतचे मुकाबले बघितले तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतात. असे झाल्यास भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच विश्वचषकमध्ये दोनवेळा एकमेकांविरुद्ध खेळतील.

गुणतालिकेत न्यूझीलंड पहिल्या (11), ऑस्ट्रेलिया दुसर्‍या (10), भारत तिसर्‍या (9), इंग्लंड चौथ्या (8), तर बांगलादेश पाचव्या (7), श्रीलंका (6) सहाव्या, पाकिस्तान सातव्या (5), वेस्ट इंडिज (3) गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. या आठही टीम सध्या सेमी फायनलच्या रेसमध्ये आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान (0 पॉईंट) या रेसमधून बाहेर आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सेमी फायनल खेळणे जवळपास निश्चित आहे. तर चौथ्या स्थानासाठी पाच टीम (इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज) यांच्यामध्ये स्पर्धा आहे.

पाकिस्तानने आपल्या 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानच्या खात्यात 5 गुण आहेत. आता पाकिस्तानला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला, तर त्यांचे 11 गुण होतील. तसेच जर इंग्लंड त्यांच्या दोन सामने आणि बांगलादेश आणि श्रीलंका त्यांची एक-एक सामना हरला तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचू शकते. पाकिस्तानची 11 गुणांसह सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता आहे. पहिल्या स्थानासाठी भारत-न्यूझीलंडमध्ये स्पर्धा आहे. या दोघांनी आतापर्यंत या विश्वचषकामध्ये एकही सामना हरला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीच्या शेवटी दोन्ही टीमना पहिल्या क्रमांकावर राहायची संधी आहे. जर भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला तर सेमी फायनलमध्ये त्यांचा मुकाबला पॉईंट्स टेबलमधल्या चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. त्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात सामन्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसर्‍या सेमी फायनलमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाच्या टीम खेळतील.

भारताला आता वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे. इंग्लंड सोडलं तर उरलेल्या तिन्ही सामन्यात भारत जिंकण्याचा दावेदार आहे. जर भारत चारही सामने जिंकला तर त्यांच्या खात्यात 17 गुण होतील. दुसरीकडे न्यूझीलंडचे सामने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. न्यूझीलंडचा जर फक्त पाकिस्तानकडून पराभव झाला, तर त्यांचे जास्तीत जास्त 15 गुण होतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!