भारत आणि अफगाणिस्तानवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

अमेरिकेच्या गुप्तचर खात्याची माहिती

0

पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये हल्ला करायच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिला आहे.

जगभरात असलेला दहशतवाद्यांचा धोका याबद्दल अमेरिकी काँग्रेसला माहिती देताना राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक डॅनियल कोट्स यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यास पाकिस्तानला अपयश आले आहे.

या परीसरातल्या अमेरिकेच्या हितसंबंधांना या दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे कोट्स म्हणाले आहेत.

तसेच या दहशतवादी संघटना भारत व अफगाणिस्तानात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची आपली माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी दिली आहे.

तालिबानमुळे अफगाणिस्तानची स्थिती नाजूक असल्याची स्थिती असल्याचे गुप्तचर संस्थांचे निरीक्षण आहे.

तर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांमुळे परिस्थिती बिकट आहे. भारताचे परराष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित होत असून त्यामुळे पाकिस्तानसमोर एकाकी पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे कोट्स यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनकडे जास्त झुकेल असेही कोट्स यांनी संसदेला सांगितले आहे.

या सगळ्या स्थितीत दहशतवादी संघटना जोर धरत असून भारत व अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये दहशतवादी हल्ले होऊ शकतात अशी भीती कोट्स यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*