भारतीय स्टेट बँकेच्या पेन्शनर्स असोसिएशनचा मेळावा संपन्न

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय स्टेट बँकेच्या नगर जिल्ह्यातील निवृत्त पेन्शनधारकांचा मेळावा पटियाला हाऊसच्या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे येथील असोसिएशनचे पदाधिकारी विलास गंधे, चंद्रकांत कुलकर्णी, अशोक पंडित, डी ए. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नगर शाखाध्यक्ष एस. आर. जोशी यांनी प्रास्ताविक व प्रमुख अतिथींंचा परिचय करून दिला. गतवर्षी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सेक्रेटरी भास्कर देशपांडे मांनी अहवाल सादर केला. खजिनदार जयंत जोशी यांनी जमा-खर्च सादर केला. स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी निवड करताना अगोदरचीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात यावी. असा ठराव जयराम थदाणी यांनी मांडला, त्याला सर्वांनीच अनुमोदन दिले. त्यानुसार अध्यक्ष एस. आर. जोशी, सेक्रेटरी भास्कर देशपांडे व खजिनदार जयंत जोशी कायम राहिले.

पुणे झोनलचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात निवृत्ती वेतनवाढ, थकबाकीसंबंधी झालेले करार व इतर नियमांची माहिती दिली. याप्रसंगी देणगीदार सभासदांचा सत्कार करण्यात आला. विलास गंधे मांनी सहाव्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणारी वाढीव पेन्शन, लागणारा कालावधी यावर सखोल चर्चा केली. भारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या पेन्शनर्सच्या बैठकीला क्षेत्रीय कार्यालयातील नगर जिल्ह्याचे सहाय्यक महाप्रबंधक दिनकर वारंग, नगर शाखेचे सहाय्यक महाप्रबंधक मेघश्याम इंजेवार, धनंजय कार्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी मेघश्याम इंजेवार व दिनकर वारंग यांनी निवृत्त पेन्शनधारकांना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.

गणेश राठी यांनी नवीन विमा योजनासंबधी माहिती दिली. याप्रसंगी नगर शाखेचे यशवंत अमृत, राघवेंद्र देसाई, बुरुडगाव शाखेचे शाखाधिकारी प्रभू के. आर, चौधरी, दिगंबर वाघमारे व विविध तालुक्यातील पेन्शनधारक मोठमा संख्येने उपस्थित होते. अशोक नवले यांनी आभार मानले. साहित्यिक सदानंद भणगे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

*