भारतीय सैन्याकडून पाकला प्रत्युत्तर; पाकच्या चौक्या उद्ध्वस्त

0

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

यावेळी भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकच्या सीमारेषेवरील चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय सैन्याकडून या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे.

या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्धस्त झाल्याचेही दिसत आहे.

१ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा जोरदार मारा केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी पाकने शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती.

LEAVE A REPLY

*