Type to search

क्रीडा

भारतीय संघ निवडीवर गांगुली नाराज

Share

मुंबई | वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंना जास्त संधी द्यावी, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.

कुलदीप यादवला बाहेर बसवल्यामुळे मला आश्‍चर्य वाटले. याआधी भारताने खेळलेल्या शेवटच्या कसोटीमध्ये कुलदीपने ५ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये झालेल्या या कसोटीसाठीची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल होती, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. अश्‍विनला संघाबाहेर बसवण्यावरही गांगुलीने भाष्य केले. ‘अश्‍विनचे रेकॉर्ड उत्तम आहे. पण त्याची निवड न करण्याचा निर्णय विराटने घेतला. पुढच्या दोन दिवसांमध्ये जडेजा किती विकेट घेतो त्यावर सगळे कळेल. कारण आता खेळपट्टीवर चेंडू अचानक खाली राहतील किंवा वरती उसळतील,’ असे गांगुली म्हणाला.

अश्‍विनला डावलण्यात आले असले तरी संघामध्ये स्पर्धाही तशीच असल्याचेही गांगुलीने सांगितले. याआधीही भारतीय टीमच्या निवडीवर अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. आक्रमक फलंदाज हवेत म्हणून चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला संघामधून वगळण्यात आले होते तेव्हा विराटवर टीका झाली होती. खेळाडूंची निवड करा आणि त्यांना जास्त आणि सातत्यपूर्ण संधी द्या. यामुळे खेळाडूंना विश्‍वास मिळतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्येे श्रेयस अय्यर कसा खेळला हे सगळ्यांनी बघितले. तुम्ही त्याची निवड केली आणि त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. तसेच स्वातंत्र्य आणि संधी बर्‍याच खेळाडूंना मिळाली पाहिजे. विराट ही संधी देईल, असा मला विश्‍वास आहे, असे वक्तव्य गांगुलीने केले. पहिल्या कसोटीदरम्यान अश्‍विनला डावलण्यात आल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरही चांगलेच भडकले. अश्‍विनने वेस्ट इंडिज-विरुद्धच्या ११ कसोटींमध्ये ६० विकेट घेतल्या. यात चारवेळा एका डावामध्ये ५ विकेटचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!