Type to search

क्रीडा

भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जींसह तिघांना नोबेल

Share

नवी दिल्ली। भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मायकल क्रेमर यांनाही संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीन अर्थशास्त्रज्ञांना वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान बहाल करण्यात येणार आहे.

अभिजीत बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आणि त्यांची पत्नी डफलो मअब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अ‍ॅक्शन लॅबफ चे को-फाउंडर आहेत. बॅनर्जी यांनी 1981 मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर 1983 मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. 1988 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल 50 लाख मुलांना फायदा झाला आहे.

नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की या अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनातून गरीबीचं उच्चाटन करण्यात मदत मिळत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांच्या प्रयोगावर आधारित प्रयत्नांतून विकासात्मक अर्थशास्त्रात मोठे बदल घडून आले आहेत. यामुळे रिसर्चच्या क्षेत्रात नवी प्रगती झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!