भारतीय अंडर -17 फुटबॉल संघाचा इटलीवर 2-0 ने विजय

0
भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने शुक्रवारी मैत्रीपूर्ण सामन्यात इटलीवर 2-0 असा विजय मिळवला.
वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी भारताचा अंडर-17 संघ सध्या युरोप दौ-यावर असून, इटलीच्या अंडर-17 संघाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्यात आले होते.
भारताकडून अभिजीत सरकारने 31 व्या आणि राहुल प्रवीणने 80 व्या मिनिटाला गोल केला. यावर्षी भारतामध्ये अंडर-17 फुटबॉलचा वर्ल्डकप होणार आहे.
या सामन्यात भारताच्या युवा संघाने जास्तवेळ बॉल आपल्या ताब्यात ठेवला आणि गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या.

LEAVE A REPLY

*