भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मागितली माफी

0

भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केल्यानंतर हॉटेलवर परतणा-या ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली.

या घटनेचा निषेध करत काही भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर काही भारतीय चाहत्यांनी हातात पोस्टर घेऊन सॉरी म्हणत खेळाडूंची माफी मागितली.

LEAVE A REPLY

*