भारताने मालिका 2-1 ने गमावली

0

हेमिल्टन । भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टन येथे झालेला तिस-या टी- 20 सामन्यात न्यूझीलंडने 4 धावांनी निसटता विजय मिळवून मालिका खिशात घातली. पहिला सामना न्यूझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. अखेर तिसरा सामना जिंकत किवी संघाने 2-1 अशी मालिका जिंकली.

आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, किवी फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत 20 षटकात 4 बाद 212 धावा ठोकल्या. कुलदीप यादव वगळता भारताचे सर्व गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व खलील अहमद यांच्यासह पांड्या बंधूंना किवी फलंदाजांनी झोडपून काढले. कुलदीपने 4 षटकात 26 धावा देत 2 गडी टिपले.

किवींकडून सलामीवीर सेफर्टने 25 चेंडूत 43 तर कोलीन मुन—ोने 40 चंडूत 72 धावा कुटल्या. या जोडीने 8 षटकात 80 धावांची सलामी देताना तब्बल 8 षटकार ठोकले. त्यानंतर केन विल्यमसन (27) आणि कोलीन ग—ँडहोमने (30) करून संघाला मजबूत स्थितीत नेले. शेवटी मिशेल (नाबाद 19) आणि रॉस टेलरने (नाबाद 14) संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन (5) सुरूवातीलाच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ( 32 चेंडूत 38) आणि विजय शंकरने (28 चेंडूत 43) यांनी संघाला सुस्थितीत नेले. मात्र, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. ॠषभ पंत (28), हार्दिक पांड्या (21) आणि महेंद्रसिंग धोनी (2) फारसे चमक दाखवू शकले नाहीत.

त्यामुळे भारताची 15 षटकात 6 बाद 145 अशी घसरगुंडी उडाली.

मात्र, त्यानंतर दिनेश कार्तिक आणि क्रृणाल पांड्या यांची जोडी जमली. त्यांनी भारताला 5 षटकात 60 हून अधिक काढल्या. कार्तिकने 16 चेंडूत चार षटकारांसह नाबाद 33 ठोकल्या तर क्रृणाल पांड्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद 26 धावा काढल्या. मात्र, भारताला विजयासाठी 4 धावा कमीच पडल्या. भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 208 धावाच करू शकला. 72 धावा काढणारा कोलीन मुन—ो सामनावीर ठरला तर सलामीवीर सेफर्ट मालिकावीर ठरला.

धोनीचे मैदानावरील देशप्रेम
वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टवेन्टी टवेन्टी टीम इंडियाचा अनुभवी शिलेदार महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम मैदानावर पाहायला मिळाला. अचानक मैदानात आलेल्या चाहत्याच्या हातातला तिरंगा पायाजवळ जाण्यापूर्वीच काढून घेत पुन्हा एकदा आपलं देशप्रेम प्रथम असल्याचं दाखवून दिलं.भारत वि. न्यूझीलंड अखेरच्या टवेन्टी टवेन्टी सामन्यात भारताने टॉस जिंकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राच्या 14 व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता महेंद्रसिंग धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा चाहता धावत येत धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली बसला.

पण धोनीने हातातला तिरंगा पायाजवळ जाण्यापूर्वीच काढून घेतला.मैदानातील धोनीच्या या देशप्रेमाबद्दल सगळीकडूनचं कौतुकांचा वर्षाव होत आहे. यातून देशप्रेम हे नेहमीच आपल्यापुढे असल्याचं पुन्हा एकदा धोनीनं दाखवून दिलं आहे.दरम्यान रोहित शर्माच्या टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यातल्या तिसर्‍या आणि अखेरच्या टवेन्टी टवेन्टी सामन्यात चार धावांनी निसटती हार स्वीकारावी लागली. न्यूझीलंडनं हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.सामन्यात न्यूझीलंडनं भारतीय संघासमोर विजयासाठी 213 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सोळाव्या षटकात सहा बाद 145 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्यानं सातव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी रचली. कार्तिकनं 16 चेंडूंत नाबाद 33, तर कृणालनं 13 चेंडूंत नाबाद 26 धावांची खेळी केली.

LEAVE A REPLY

*