भारतवंशीयांचा ‘आेबामा केअर’ला पाठिंबा

0
अमेरिकेतील भारतवंशीय लोकप्रतिनिधींनी आेबामा केअरला पाठिंबा दिला आहे.
ट्रम्प सरकारने मांडलेल्या नव्या योजनेच्या प्रस्तावाला त्यांचा विरोध करताना त्याच्याविरोधात मतदान केले. हा प्रस्ताव लोकप्रतिनिधी सभागृहात मंजूर झाला आहे.
परंतु त्याची अंमलबजावणी झाल्यास सुमारे २ कोटी ४० लाख अमेरिकन नागरिकांवर आरोग्य सेवेपासून वंचित होण्याची वेळ आली आहे, अशी भारतीयांची चिंता आहे.
लोकप्रतिनिधी सभागृहात भारतवंशीय चार प्रतिनिधी आहेत. अॅमी बेरा (डेमॉक्रॅटिक पार्टी), रो खन्ना, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती यांनी नवीन प्रस्तावाला विरोध दर्शवला.
हा प्रस्ताव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मांडण्यात आला होता. एकीकडे व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन नेते प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत होते.

LEAVE A REPLY

*