भादली हत्त्याकांडप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  तालुक्यातील भादली येथे झालेल्या चौघांच्या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येवून, आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भादली येथे घडलेली दुदैवी हत्याकांडाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिपल्स रिपब्लीकन पार्टी यांच्यासह दहा संघटनांच्यावतीने उद्या दि.२४ रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत इन्साफ मुक मोर्चा काढण्यात येणार असून लेवा समाजासह शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच दि.२५ रोजी भादली बंद पाठोपाठ जळगाव जिल्हा बंदचे आवाहन देखील जगन सोनवणे यांनी केले आहे.

भादलीची घटना अत्यंत गंभीर असून देखील जिल्हयातील एकही नेता रस्त्यावर उतरेला नाही. जिल्ह्यातील तिन्ही मंत्री निवडणुकीत व्यस्त आहे

पालकमंत्री असंवेदनशील
भादली येथे घडलेल्या हत्याकांडाला चार होवून देखील जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी भादली येथे भेट दिलेली नसल्याने ते या घटनेबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप जगन सोनवणे यांनी केला आहे.

ऍड. निकम यांची नियुक्ती करा

भादली घटनेती आरोपींना अटक झाल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रकियेसाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी देखील पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.

आरपीआयतर्फे भादली घटनेचा निषेध

तालुक्यातील भादली येथे एकाच कुटुंबातील प्रदीप भोळे यांच्यासह पत्नी व मुलांचा निर्घृण हत्या करण्यात आली. घडलेली घटना ही समाजाला मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. दरम्यान, घटनेतील संशयित आरोपींना तात्काळ अटक होवून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी तसेच त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली.

या घटनेचा निषेध करण्यात आले असल्याचे आरपीआयच्या तालुकाध्यक्षा रमाताई ढिवरे यांनी केली.

LEAVE A REPLY

*