Type to search

धुळे

भाजपा माणसं, विचार संपविणारा पक्ष -किरण शिंदे

Share

आर्वी । काँग्रेसच्या आघाडी सरकारने सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देत न्याय दिला आहे, मात्र भाजपाने बहूजन समाजाच्या माणसांना साधी उमेदवारी सुध्दा दिली नाही. कारण भाजपा माणसं आणि विचार संपविणारा पक्ष आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केला.

आ.कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ आर्वी येथे काँग्रेस आघाडीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. शिंदे हे बोलत होते. पुढे बोलतांना किरण शिंदे म्हणाले की, कुणाल पाटील हे माणसं जपणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत. विधानभवनातील त्यांची शेतकर्‍यांची आक्रमक कामगिरीमुळे काँग्रेस आघाडी पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागली. काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यावर आ.कुणाल पाटील हे मंत्री होतील. काँग्रेसने शेतकर्‍यांची कर्जमाफी करून शेतकर्‍यांचे रक्षण आणि विकास केला. जनतेला आ.कुणाल पाटील यांचा सारखा हक्काचा माणूस पाहिजे. त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत. पक्षाच्या पातळीवर त्यांचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे.त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत असा आत्मविश्वास किरण शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

कुणाल पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचे काम भाजपाने केले आहे. कर्जमाफीचे आश्वासन देवून सत्ता मिळवली. आज शेतकरी संकटात आहे आत्महत्या वाढल्या आहेत. तरीही हे भाजपावाले मते मागत फिरत आहेत. विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यावर शेतकर्‍यांची कर्जमाफी केली जाईल त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, विकासाचा रथ असाच पुढे घेवून जाण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. अनेक संकटे, जय पराजय पाहूनही आम्ही कधी सेवेचे व्रत सोडले नाही. असे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!