भाजपा जिल्हाध्यक्षांच्या तोंडाला काळे फासणार

0

जळगाव / जिल्हा बँकेला कुलुप लावण्याचा प्रयत्न जरी झाला तरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या तोंडाला पहील्यांदा मी काळे फासेल असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी दिला.

शेतकर्‍यांना न्याय देण्याऐवजी शेतकर्‍यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेला कुलुप लावण्याची भाषा करणार्‍या भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याची टिका जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केली.

ते पुढे म्हणाले की, कर्मचारी भरतीवरून जिल्हा बँकेला कुलूप लावण्याचे त्यांचे वक्तव्य म्हणजे बुध्दीची किव येण्यासारखे आहे.

जिल्हा बँकेच्या तोट्यातील शाखा बंदचे आदेश असले तरी शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणुन ह्या शाखा सुरू आहेत. कर्मचारी भरतीचा मुद्दा हा वेगळा आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे आहे.

भाजपा जिल्हाध्यक्षांनी बँकेला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडाला पहील्यांदा मी काळे फासेल असा इशाराही अनिल भाईदास पाटील यांनी दिला.

LEAVE A REPLY

*