Type to search

धुळे

भाजपातर्फे मोहाडी उपनगर येथे आज आरोग्य शिबीर

Share

धुळे | सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. माधुरी बोरसे व भारतीय जनता पार्टी – मोहाडी उपनगरतर्फे पिंपळादेवी विद्यालय व मनपा शाळा क्र. ५५,५६ मोहाडी उपनगर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये धुळे शहर तसेच नाशिक व मुंबई येथील ३० हुन अधिक सुप्रसिद्ध तज्ज्ञ रुग्णांची तपासणी करतील. सदर शिबिरामध्ये कॅन्सर, हृदय रोग, अस्थिरोग मणकेविकार, फ्रॅक्चर, सांधे विकार,स्त्रीरोग, बालरोग, मूत्रविकार मुतखडा, प्रोस्टेट, किडनीविकार डायलेसिस, मानसिक रोग, मेंदूविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कान नाक घसा, दंतरोग, त्वचा रोग नेत्ररोग आदी विकारांवर तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात मोफत नोंदणी व बाह्यरुग्ण तपासणी, गरजू रुग्णांना औषधे, रक्त लघवी, ई.सी.जी., कमी ऐकू येणार्‍यांसाठी मोफत कानाची तपासणी (ऑडिओमेटरी) व मोफत कानाचे मशीन, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी,पसमेकर उपचार, स्तनाचे, तोंडाचे व गर्भपिशवीच्या कॅन्सरचे शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे किडनीतील, मूत्रमार्गातील मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथीचे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, डायलेसिस व Aत फिस्टुला शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मणक्यांचे शस्त्रक्रिया, बी.एम.डी (हाडांचे ठिसूळपणाचे निदान) तपासणी, सोनोग्राफी, एम.आर.आय., सि.टी स्कॅन, २ऊ इको मध्ये सवलत तसेच आजार आढळल्यास पुढील तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निरामय हॉस्पिटल, ८० फूट रोड, धुळे येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, बबन चौधरी, अनुप अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!