Type to search

नंदुरबार राजकीय

भाजपाचे आजपासून सदस्य नोंदणी अभियान

Share

नंदुरबार । भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हयाच्या वतीने नवीन सदस्यता अभियान तथा नव मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ दि.6 रोजी सकाळी 10 वा. नंदुरबार जिल्हयातील सर्व मंडळ स्तरावर एकाच दिवशी एकाच वेळेवर आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व महाराष्ट्राचे अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांच्या सुचनेनुसार सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीने पुनश्च नवीन सभासद नोंदणी अभियान हाती घेतले असून याचबरोबर नव मतदार नोंदणी अभियानदेखील दि. 6 रोजी सुरु केले जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ नंदुरबार येथे सुभाष चौकात सकाळी 11 वाजता जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते तर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

धडगांव येथे खा.हिना गावीत व आ.डॉ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. तळोदा येथे आ.उदेसिंग पाडवी व नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, उपनगरअध्यक्षा सौ.भाग्यश्री चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शहादा येथे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपा शहर माजी अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली, अक्कलकुवा येथे नागेश पाडवी यांच्या उपस्थितीत, नवापूर येथे अनिल वसावे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहेत. नंदुरबार शहरात एकुण नोंदणी अभियानाचे 12 केंद्र राहणार असून या 12 केंद्रावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा पर्यत नवीन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!