भाजपचे स्वबळाचे ढोल! महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची केली घोषणा

0

महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची केली घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील महापालिकावर सत्तेचा झेंडा फडकविणार्‍या मिरा-भाईंदर महापालिका विजयी मालिकेने नगर शहर भाजपने स्वबळाचे ढोल पिटले. फटाक्याची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा करणार्‍या भाजपने आगामी अहमदनगर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा फटाका फोडला.
मिरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविणार्‍या भाजपचा विजयोत्सव नगर शहर भाजपने गांधी मैदानात फटाके फोडत साजरा केला. तत्पुर्वी पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. शहर सरचिटणीस किशोर बोरा यांनी आगमी अहमदनगर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव मांडला. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. जेष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
रामदासी म्हणाले, पूर्वी कधीतरी आनंदोत्सव साजरा करण्याची भाजपला संधी मिळत. आता सातत्याने आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळत आहे. विकासाच्या मुद्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकतही आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे विजयात योगदान आहे. आता अहमदनगरची महापालिका जिंकायची आहे. त्यासाठी पक्षाने दिलेला अजेंडा अंमलात आणायचा आहे. भाजपच्या विजयी घोडदौडमुळे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेसच्या नेत्यांचे मनोधर्य खचत चालले आहे.
किशोर बोरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी केले. नरेश चव्हाण यांनी आभार मानले. विश्‍वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शकीर सय्यद्द, बाळासाहेब भोर, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, विनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोेरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदीप पवार, सुनिल सकट, जालिंदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर शहरावर 25 वर्ष शिवसेनेच्या तर गत तीन वर्षापासून राष्ट्रवादीच्या आमादराचा अंमल आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला महापौर पद मिळाले. मात्र भाजप या पदापासून दूर राहिला. आता परिस्थिती बदलली आहे. नगर शहरातील निवडणूका जिंकण्याची संधी भाजपला चालून आली आहे. 2018 मधील महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
– श्रीपाद छिंदम, उपमहापौर

केंद्रातील भाजप सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे पक्षाच्या मागे उभी आहे. नगरात खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण व धाडसी निर्णय सरकार घेत आहे. शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जामाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता नगर जिंकण्याची बारी आली आहे.
– सुवेंद्र गांधी, गटनेता.

LEAVE A REPLY

*