Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भाजपकडून ईडीचा दबावासाठी वापर – बाळासाहेब थोरात

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा हा राजकारणाचा दुर्दैवी प्रकार आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर आणि यंत्रणांच्या मदतीने विरोधातील आवाया दाबण्याचे राजकारण आता सामान्य जनतेच्याही ध्यानात आले आहे. 5 वर्षापूर्वी कोणाला माहिती नसलेली ईडी आता घराघरात पोहचली आहे. याचा राज्यातील प्रत्येकाने निषेध केला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

गुरूवारी त्यांनी याविषयावर पत्रपरिषदेत भुमिका मांडली.संबंध नसताना ईडीमार्फत शरद पवारांना प्रकरणात गोवून भाजप सरकारने वेगळाच संदेश जनतेला दिला आहे. मात्र पवारांनी महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवून दिला आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही, हे त्यांनी सिध्द केले आहे. ते 50 वर्षापेक्षा अधिक राज्य व केंद्राच्या संसदीय कामकाजात सहभागी आहेत. राज्य आणि देशातील शेतकर्‍यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय, धोरणे त्यांनीच आखली. त्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजप सरकारने ईडीचा वापर केला आहे. समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शरद पवार हे राज्यातील सर्वसमावेशक नेतृत्व आहे. अलिकडच्या काळात त्यांच्या दौर्‍यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कटकारस्थान करून त्यांचे नाव घोटाळ्यात गोवण्याचे प्रयत्न झाले. आगामी काळात महाराष्ट्रात असा अन्याय सहन केला जाणार नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सत्ताधारी भाजपाने हे घडवून आणले. लोकशाहीत विश्‍वास असलेल्या प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला पाहिजे.

 शिर्डी मतदारसंघात काँग्रेसकडे अनेक इच्छुक आहेत. सक्षम उमेदवार देवून आव्हान उभे करणार आहोत.
काँग्रेसमध्ये आत्मा राहिला नाही, अशी वक्तव्य करणार्‍यांनी आपणही आधी याच पक्षात वाढलो हे विसरू नये, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणुकीत भाजप सरकारचे कारनामे जनतेसमोर उघड करणार आहोत.
आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात लवकरच निर्णय होईल व उमेदवार जाहीर होतील असेही आ.थोरात यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!