Type to search

भागापूर गावाचा पाणीप्रश्न गंभीर, पाणीपुरवठा करणारी विहिर आटली

maharashtra धुळे

भागापूर गावाचा पाणीप्रश्न गंभीर, पाणीपुरवठा करणारी विहिर आटली

Share
धुळे । साक्री तालुक्यातील भागापूर गावातही पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहिरी देखील आटल्याने ग्रामस्थांसह जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरी बुराई धरणाच्या डाव्या चारीत पाणी सोडून त्याव्दारे गाव तळे भरावे. त्यामुळे विहिरीला पाणी आल्यास पाणीप्रश्न तात्पुरत्या स्वरूपात सुटेल, अशी मागणी गावाच्या सरपंच सारजाबाई अहिरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भागापूर हे गाव मेंढपाळ वस्तीचे गाव आहे. गावात शेळ्या, मेंढ्या व गुरे पाळणार्‍यांची संख्या मोठी आहे. परंतू यंदा गावाला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहिरी देखील आटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या व गुरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

तरी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बुराई धरणाच्या डाव्या चारीत मोटारींव्दारे पाणी सोडून ते गावाला लागून असलेल्या गाव तळ्यात सोडावे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीला फायदा होईल. गावकर्‍यांसह गुरांचा पाण्याच्या प्रश्न सुटेल. तरी गावाला पाणी प्रश्न सोडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सारजाबाई सखाराम अहिरे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!